Congress plenary session Day 2 | सोनिया गांधींनी दिले निवृत्तीचे संकेत, म्हणाल्या, ‘माझ्या राजकीय कारकिर्दीची सांगता….’

Congress plenary session Day 2 | सोनिया गांधींनी दिले निवृत्तीचे संकेत, म्हणाल्या, ‘माझ्या राजकीय कारकिर्दीची सांगता….’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील रायपूर येथे काँग्रेसच्या ८५ व्या पूर्ण अधिवेशनाचा आज (दि. २५) दुसरा दिवस आहे. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी संबोधित केले. सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत देत म्हटले की, "त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सांगता भारत जोडो यात्रेने होऊ शकली, जी काँग्रेससाठी टर्निंग पॉइंट ठरली". खंबीर कार्यकर्ते ही पक्षाची ताकद आहे, असेही त्या म्हणाल्या. "काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नाही, तर येथे लोकशाही आहे," असेही त्यांनी नमूद केले. (Congress plenary session Day 2)

डॉ. मनमोहन सिंग यांचे सक्षम नेतृत्व तसेच २००४ आणि २००९ मधील काँग्रेसच्या यशाने मला वैयक्तिक समाधान मिळाले. पण मला सर्वात जास्त समाधान मिळाले ते म्हणजे माझ्या राजकीय कारकिर्दीची सांगता भारत जोडो यात्रेने होऊ शकली, जी काँग्रेससाठी एक टर्निंग पॉइंट ठरली, असे सोनिया गांधी यांनी म्हटले.

यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या की, काँग्रेस आणि संपूर्ण देशासाठी हा आव्हानात्मक काळ आहे. भाजप-आरएसएसने देशातील प्रत्येक संस्था काबीज करून उद्ध्वस्त केली आहे. अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जात आहे. सर्वांनी एकत्रित राहून सामोरे गेले पाहिजे. भाजपकडून जातीपातीच राजकारण सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. (Congress plenary session Day 2)

सेवा, संघर्ष और बलिदान सबसे पहले हिंदुस्तान

"सेवा, संघर्ष और बलिदान सबसे पहले हिंदुस्तान" अशी नवी घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसच्या ८५ व्या पूर्ण अधिवेशनात केली आहे. यावेळी खर्गे म्हणाले की, "काँग्रेसचे पूर्ण अधिवेशन थांबवण्यासाठी भाजपने कार्यकर्त्यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली. पण आम्ही त्यांचा सामना केला आणि हे अधिवेशन आयोजित केले. सर्व आव्हानांना आपण तोंड देऊ. भारत जोडो यात्रा ही देशासाठी सूर्यप्रकाशासारखी होती. हजारो लोकांनी राहुल गांधींशी हातमिळवणी करून काँग्रेस अजूनही त्यांच्या हृदयात असल्याचे सिद्ध केले," असेही खर्गे यांनी म्हटले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news