

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : भंडारा येथील तुमसर शहरातील देव्हाडी मार्गावर प्रेमप्रकरणातून धारदार शस्त्राने तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि. ३) संध्याकाळी ७ च्या दरम्यान घडली. सचिन गजानन मस्के (वय ३४ रा. शिवाजीनगर, तुमसर ) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुमसर शहरातील देव्हाडी मार्गावरील हॉटेलमध्ये सचिनसह तीन ते चारजण जेवण करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी गेले होते. जेवण आटोपून हॉटेलच्या बाहेर आल्यानंतर क्षुल्लक कारणावरुन वाद झाले. यातून सचिनच्या पाठीवर व पोटावर धारधार हत्याराने वार करण्यात आले. यामध्ये तो जागीच ठार झाला. त्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. हा संपूर्ण प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.
स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तुमसर पोलिसांनी कुलदिप मनोहर लोखंडे, केतन दिलीप मदारकर (रा. शिवाजी वॉर्ड, तुमसर) यांना अटक केली. तर रनजीत सहादेव गभने हा पसार आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या करण्यात आली, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा