

जामखेड पुढारी वृतसेवा –
पुण्यश्लोेक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी चौंडी येथील शासकीय कार्यक्रमात माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या व उत्सव समिती, मनसे, भाजपच्या वतीने खर्डा चौकात निषेध करण्यात आला, तसेच गोटे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली.
माजी आमदार गोटे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा गौरव करताना देशातील लोकोत्तर राजमाता व महाराणी यांंच्याविषयी बेजबाबदार वक्तव्य करून त्यांचा महापुरुषांचा अपमान केला. पुण्यश्लोक होळकर आराध्य दैवत असून, आमच्या अस्मितेचा विषय आहे. त्यांचा गौरव करताना जाणून बुजून जातीपातीत तेढ निर्माण व्हावी, या हेतूने गोटे यांनी राजमाता व महाराणी यांच्या विषयी अपशब्द वापरले आहेत.
यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाजप, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती जामखेड आदी उपस्थित होते. यावेळेी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वच मूग गिळून गप्प बसले. माजी आमदाराच्या या वक्तव्याविषयी चकार शब्दही न काढणार्या तथाकथित मातब्बर नेते मंडळींचा देखील आम्ही सर्व शिवप्रेमी व ग्रामस्थ निषेध करतो.