कर्नाटक राज्यात कोरोनाबळी शेतकर्‍यांना कर्जमाफी

कर्नाटक राज्यात कोरोनाबळी शेतकर्‍यांना कर्जमाफी

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक सरकार कोरोनाने मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांची जिल्हा मध्यवर्ती तसेच अ‍ॅपेक्स बँकांकडून कर्जमाफी करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.

सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर यांनी ही माहिती दिली. येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कोरोनाबळी ठरलेल्या शेतकर्‍यांची माहिती संग्रहित केली जात आहे. दोन दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

नफ्यामध्ये असणार्‍या बँकांकडून कर्जमाफी करता येईल. शेतकर्‍यांनी घेतलेले एकूण कर्ज, परतफेड केलेली रक्‍कम, कर्जाचे प्रमाण आदींचा विचार करून निर्णय घेतला जाणार आहे.

चित्रपटगृहांचा कर माफ 

कर्नाटक राज्यात सुमारे 630 सिंगल स्क्रीन थिएटरना 2021-22 या वर्षासाठी मालमत्ता कर माफ केला जाणार आहे.

सिंगल स्क्रीन थिएटर मालक संघटनेने मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची भेट घेतली. त्यावेळी कर माफ करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. कोरोनाने राज्यातील चित्रपटगृहे बंद होती.

दोन महिन्यांपर्यंत व्यवसाय ठप्प होता. अशावेळी मालमत्ता कर भरण्यासबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पहिल्या लाटेनंतर केवळ 50 टक्के प्रेक्षकांसह चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी मिळाली. पण, केवळ दीड महिनाच व्यवसाय सुरू राहिला.

दुसर्‍या लाटेवेळी चित्रपटगृह पूर्णपणे बंद राहिली. त्यामुळे मालमत्ता कर माफ करण्याची मागणी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली.

हे वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news