हिंदू-मुस्लीम : मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्याचा अर्थ काय? 

हिंदू-मुस्लीम : मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय?
हिंदू-मुस्लीम : मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय?

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : हिंदू-मुस्लीम हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  राष्ट्रीय मुस्लीम मंचच्या एका पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदू-मुस्लीम मुद्द्यावरून वक्तव्य केले, यावरून चर्चा सुरू झाली.

मोहन भागवत म्हणाले की, "हिंदू-मुस्लीम एकता ही भ्रामक कल्पना आहे. ते वेगळे नसून एकच आहेत. सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे, ते कोणत्याही धर्माचे का असेनात. आपण सर्व एकाच पुर्वजांचे आहेत.

भागवतांच्या या वक्तव्यावरून देशात चर्चेला सुरूवात झाली. भाजपप्रणीत केंद्र सरकारने त्यांच्या वक्तव्याचा पुरस्कार करण्यास सुरूवात केली. तर, विरोधी पक्षांकडून या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

काॅंग्रेसचे नेते दिग्विजय सिंहपासून बसपा प्रमुख मायावती, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, या सर्वांनी विरोधकांनी मोहन भागवतांनी हिंदू-मुस्लीम संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.

हिंदू-मुस्लीम मुद्द्याचा आताच्या चर्चेच्या दुर्बिणीतून विचार केला, आगामी काळात उत्तर प्रदेशासहीत इतरही काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे भाजप आणि संघ मुस्लीमांची मतं आपल्या बाजून वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं विरोधकांना वाटतं आहे.

राजकीय क्षेत्र असं आहे की, डोळ्यांसमोर निवडणुका दिसू लागल्या तर, धर्माचे मुद्दे चर्चेला मुद्दाम आणले जातात. अशा परिस्थितीत हे लक्षात ठेवायला हवं की, आरआरएस भेलही भाजपच्या मागे असेल. पण, आरआरएस हे काही राजकीय संघटन नाही किंवा संघाचे प्रमुख हे राजकीय नेता आहेत.

त्यामुळे भागवतांनी केलेल्या वक्तव्याला राजकीय कोंदण लावणं योग्य होणार नाही. मूळात त्यांनी केलेलं वक्तव्य कोणत्याही अर्थानं घेतलं तरी, एका प्रकार एकतेची भावना असलेलं आणि हिंदू-मुस्लीमांना एकत्र करणारं विधान आहे. त्यामुळे त्याच्यावरून राजकारण करणं तितकं योग्य होणार नाही.

मोहन भागवतांनी केलेलं वक्तव्य इतिहासाला धरून आहे. इतकंच नाही तर संविधानालाही धरून आहे. हेही खरं आहे की, मुस्लीम आक्रमकांकडून मोठ्या प्रमाणात हिंदुंचं मुस्लीम धर्मांतर करण्यात आलं. त्यामुळे आज जे धर्मांतरीत मस्लीम आहेत ते पूर्वी हिंदुुच होते. त्यामुळे हिंदू-मुस्लीम वेगळे नाहीत.

हे जसं मुस्लीम धर्माबाबतीत आहे, तसंच ते बौद्ध, जैन आणि शीख यातील धर्मांतरीत माणसांच्या बाबतीतही लागू होते. त्यामुळे आरआसएस प्रमुख मोहन भागवत यांनी जे वक्तव्य केले, ते चूक आहे असं म्हणता येत नाही. भागवतांनी असंही म्हटलं आहे की, आपण एका लोकशाहीत राहतो आहोत. त्यामुळे इथं हिंदू किंवा मुस्लीन यांचं प्रभुत्व असू शकत नाही.

इथं फक्त भारतीयांचं वर्चस्व असू शकतं. त्यामुळे भागवतांचं वक्तव्य हे संविधानाला धरून आहे, असं दिसतं. 'आम्ही भारताचे लोक', हे जे वाक्य संविधानात आहे, त्यालाच अनुसरून हे वक्तव्य आहे. कारण, सर्वप्रथम आपण भारतीय आहोत. नंतर आपला धर्म येतो.

'भारत' या केवळ एका शब्दाचा विचार केलेा तर, प्राचीन काळा दुष्यंत पूत्र राजा भरत याच्या नावावरून आपल्या देशाला भारत हे नाव मिळालेलं आहे. त्या भरताचं वंशज असल्याचं संदर्भ महाभारतात आहेत, कारण कृष्णाने अर्जुनाला अनेक प्रसंगात 'भारत' या नावाने हाक मारलेली आहे. म्हणून भारत ही आपली ओळख आहे.

मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय?
मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय?

आर्य बाहेरून आलेले आहेत, असं समजणाऱ्या इतिहासकारांचे म्हणणे खोटे ठरलेले आहे. इंग्रजी शिक्षणातून आर्य आक्रमण सिद्धांत खरा आहे, असं सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, राखीगढीमध्ये सापडलेल्या अवशेषांवरून हे सिद्ध झालं की, ही अवशेषं १२ हजार वर्षांपूर्वीची आशियातील आहेत. त्यामुळे आर्य हे इथल्याच भूूमीतील निवासी होते, हे सिद्ध झाले आहे.

एकंदरीत काय? तर वेगवेगळ्या कालावधींमध्ये वेगवेगळ्या संस्कृती संपर्कात आल्या, त्याच्या प्रभावावरून लोकसंख्या जास्त असलेल्या एका भागात माणसांची जीवनशैली आणि पूजा-अर्चेची पद्धत यांच्यामध्ये अंतर पडले. मात्र, या देशातील सर्व नागरिकांचं मूळ हे एकच आहे. ते महाभारत काळात 'भारत' नावानेच ओळखले जात होते. आज त्यांची ओळख भारतीय आहे.

भारतीय या ओळखीवरून आपल्या सर्वांना देशाला पुढे न्यायला हवं. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी जे वक्तव्य केले होते, त्याच्या मूळाशी हा ऐतिहासिक संदर्भ आहे. त्यातून राष्ट्रीय एकतेचं आव्हान करण्यात आलं आहे. त्यांमुळे भागवतांचं वक्तव्य राजकारणातून न पाहता एकतेच्या दृष्टीने पाहायला हवे.

पहा व्हिडीओ : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि पुण्याचा संबंध

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news