Hippargi Dam
Hippargi Dam : निष्काळजीपणामुळे 'हिप्परगी'तून पाणी वाया File Photo

Hippargi Dam : निष्काळजीपणामुळे 'हिप्परगी'तून पाणी वाया

माजी मंत्री श्रीमंत पाटील; संबंधितांवर कारवाईची मागणी
Published on

Water is being wasted from 'Hippargi' due to negligence

अथणी : पुढारी वृत्तसेवा

हिप्परगी धरणाचे गेट तुटून ३ टीएमसी पाणी वाहून गेले आहे. याला अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा जवाबदार असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. त्यांना निलंबित करावे, अशी मागणी माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी परगी धरणाला भेटीवेळी पत्रकारांशी बोलताना केली.

Hippargi Dam
Crime News : आर्थिक कारणातून दोघा भावांची हत्या

शासनाने उन्हाळ्यातील पाणी समस्या सोडविण्यासाठी तत्काळ महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून पाणी सोडण्यास सांगावे. सरकारच्या बेजबाबदारपणामुळे हे गेट तुटून पाणी वाया गेले आहे. अद्यापही बारीक गळती कायम आहे. अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तत्काळ गळती बंद करावी. अन्यथा अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन छेडावे लागेल.

पाणी वाहून गेल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना भेटून आम्हीही पाणी सोडण्यासाठी मागणी करणार आहोत. सरकारनेही वेळीच दखल घेऊन उन्हाळ्यातील पाणी समस्या निवारणासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.

Hippargi Dam
खादी भांडारमधून १००० ध्वजांची विक्री

यावेळी माजी जि. पं. सदस्य आर. एम. पाटील, ईश्वर कुंभार, मुरग्याप्पा मगदूम, बाहुबली अजापगोळ, दादागौडा पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news