Vijayapura Daylight Murder
सुशील काळे (Pudhari File Photo)

Vijayapura Daylight Murder | विजापुरात भरदिवसा युवकाचा खून

गेल्या आठ दिवसांतील दुसरी घटना
Published on

विजापूर : युवकावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना शहरातील एस.एस. रस्त्यावरील एस. एस. कॉम्प्लेक्समधील एका सौहार्द सहकारी संस्थेच्या कार्यालयात दुपारी 1.30 च्या सुमारास घडली. सुशील काळे (वय 43) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. दि. 9 रोजी शहरातील गॅगबाऊडी परिसरात एका युवकाचा खून झाला होता. गेल्या आठ दिवसांतील ही दुसरी घटना आहे.

या युवकावर सौहार्द सहकारी संस्थेच्या कार्यालयात चारजणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकास त्वरित उपचारासाठी शहरातील बीएलडीई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

image-fallback
विजापुरात सर्वपक्षीय कडकडीत बंद | पुढारी

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. हल्ला करून पळ काढलेल्या मारेकर्‍यांचा शोध पोलिस घेत आहेत. या हल्ल्यामागचे कारण काय तसेच हल्लेखोर कोण होते, याचा तपास सुरू आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Vijayapura Daylight Murder
Belgaum : रिंगरोडचे काम पावसाळ्यानंतर करा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news