

बेळगाव ः रिंगरोडसाठी नियोजित जमिनीतील दहा टक्के शेतकरी न्यायालयात गेले आहेत. तर 90 टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात करावी. तर हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सोमवारी (दि. 7) विकास आढावा बैठकीत केल्या.
रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात करण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात आली आहे. कामासाठी 1622 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. 32 गावांमधून रिंगरोड जाणार आहे. सुरुवातीला रिंगरोडविरोधात शेतकर्यांनी आवाज उठविला होता. मात्र, बहुतेक शेतकर्यांनी संमती दिली आहेत. सरकारकडून दिलेली भरपाई स्वीकारली आहे. 10 टक्के भूसंपादन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर ऑक्टोबर दरम्यान कामाला सुरुवात करण्यात यावी, असे बैठकीत ठरले. यावेळी भूसंपादन अधिकारी राजश्री जैनापुरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.