

UPSC topper Birdev Done
बेळगाव : कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधील यमगे गावाचा सुपुत्र बिरदेव सिद्दाप्पा डोणे याने भारतीय लोकसेवा आयोगाच्या 2025 च्या परीक्षेत देशात 551 रँक घेऊन उत्तीर्ण झाला. मेंढपाळीचा व्यवसाय म्हणजेच बेळगाव सीमाभागातील विविध गावात भटकंती करत मेंढरांना चारत एका प्रतिकूल परिस्थितून नागरी सेवा परीक्षेत बिरदेव ने झेंडा फडकावला. त्याच्या या यशाबद्दल सीमाभाग युवा समितीच्या वतीने अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन बिरदेवचा सत्कार करण्यात आला
या सत्कार प्रसंगी प्रास्ताविक करताना कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी बिरदेव ढोणे या युवकाने आपली मातृभाषा मराठीतून शिक्षण घेत एका प्रतिकूल परिस्थितून यशाला गवसणी घातली आहे. मंडोळी रोड येथे भटकंती करत आपल्या परिवारासह झोपडीत राहून यश गाठणे हे कौतुकास्पद आहे, याची प्रेरणा सर्वांनी घ्यावी.
शुभम शेळके म्हणाले की, जिद्द व चिकाटीच्या जोरावर बिरदेवने यश संपादन केले आहे. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेतले पाहिजे. बिरदेवचे यश वाखाणण्याजोगे आहे.
सत्काराला उत्तर देताना बिरदेव याने संघटनेचे आभार मानले व प्रत्येकाने आपल्या मातृभाषेत शिक्षण घेताना कुठलाही संकुचितपणा न आणता यशाची गुरुकिल्ली जाणली पाहिजे. आर्थिक परिस्थितीची काळजी न करता जिद्दीने शिक्षण घेतले पाहिजे. प्रत्येकाने निर्व्यसनी राहून समाजाला एक चांगली दिशा दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
यावेळी सरचिटणीस मनोहर हुंदरे उपाध्यक्ष प्रवीण रेडेकर, विजय जाधव, भागोजी पाटील, अशोक घगवे, राजू पाटील, रणजीत हावळाणाचे, रमेश माळवी, सचिन दळवी, दीपक गौडवाडकर, शुभम जाधव, अभिषेक कारेकर, अशोक डोळेकर, विश्वनाथ येळ्ळूरकर आदी उपस्थित होते.