दहावी निकाल : बेळगावचा टक्का घसरला चिकोडीचा सुधारला

दहावी निकाल : बेळगावचा टक्का घसरला चिकोडीचा सुधारला

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा यंदा बेळगाव जिल्ह्याचा दहावीचा निकाला सुधारणार अशी अपेक्षा होती. मात्र बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा दहावी निकाल घसरला असून, चिकोडीचा मात्र सुधारला आहे.

गतवर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्हा दहावी निकालात 87.80 टक्के गुण घेत 18 व्या स्थानी होता. तो यंदा 85.85 टक्के गुण घेत 26 व्या स्थानी आला आहे. चिकोडी शैक्षणिक जिल्हा 87.95 टक्के गुण घेत 17 व्या स्थानी आला होता. तो 91.07 टक्के गुण घेत 12 व्या स्थानी आला आहे. चित्रदुर्ग जिल्हा 96.08 टक्के गुण घेत राज्यात प्रथम आला आहे.

गतवर्षी हसन जिल्हा प्रथम स्थानावर होता. बेळगाव जिल्ह्यामध्ये सौंदतीची विद्यार्थिनी अनुपमा श्रीशैल हिरेहोळी हिने प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news