आधी राजीनामा द्या : भाजप

सिद्धरामय्यांच्या विरोधात आंदोलन तीव्र; विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न
Karnataka News
बंगळूर : विधानसौध आवारात निदर्शनावेळी बोलताना भाजप नेते गोविंद कारजोळ. शेजारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक व इतर.Pudhari photo
Published on
Updated on

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

मुडा भूखंड घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची लोकायुक्त चौकशी करण्याचे आदेश लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करून भाजप नेत्यांनी गुरुवारी (दि. 26) विधानसौधला धडक देत निदर्शने केली.

Karnataka News
म्हादई : कर्नाटक-गोवा संघर्षात ‘प्रवाह’

भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक, चलवादी नारायणस्वामी यांच्या नेतृत्वाखाली नेत्यांनी विधानसौधच्या आवारातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे धरले. त्यांनी विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्यांना अडवले. त्यांना ताब्यात घेऊन काही वेळाने सोडून दिले. त्याआधी धरणे आंदोलनावेळी विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घोटाळा केला हे खरे आहे. त्यांनी पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे. त्यांनी याबाबतची नैतिक जबाबदारी स्वीकारुन निर्णय घ्यावा. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कोणत्याही भ्रष्टाचाराविषयी बोलण्याआधी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा राजीनामा घ्यावा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news