बेळगाव : बनावट नोटा छापणारी टोळी जेरबंद

सहा जणांना अटक; बेळगावसह उत्तर कर्नाटकात खपवण्याचा प्रयत्न
Printing fake notes
Gang arrested in Belgaum
बेळगाव: बनावट नोटांची पाहणी करताना जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद. Pudhari File Photo
Published on
Updated on

बेळगाव : बनावट नोटा छापून त्या बाजारात खपवण्याचा प्रयत्न करणार्‍या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 4 लाखांच्या बनावट नोटांसह नोटा छापण्याचे साहित्य आणि एक लाखाच्या खर्‍या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी ही माहिती दिली.

Printing fake notes
Gang arrested in Belgaum
जळगाव : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; दोघांवर गुन्हा

अटक केलेल्या संशयितांची नावे

अटक केलेल्या संशयितांमध्ये अन्वर मोहंमदसलीम यादवाड (वय 26, रा. अरभावी, जि. बेळगाव), सद्दाम मुसा यडहळ्ळी (22, बागलकोट), रवी चन्नाप्पा ह्यागडी (27), दुंडाप्पा महादेव वनशेणवी (27) व विठ्ठल हणमंत होसकोटी (29, सर्व रा. महालिंगपूर, ता. रबकवी, जि. बागलकोट) यांचा समावेश आहे. या सर्वांनी नोटा छापण्याचे मशिन, संगणक, लॅपटॉप, प्रिंटरसह विविध रंग एकत्रित केले होते. हे सर्व साहित्य त्यांनी गोकाक तालुक्यातील एका गावात घर भाडोत्री घेऊन तिथे ठेवले होते. तिथेच त्यांनी नोटांची छपाई सुरू केली होती. बनावट नोटा बेळगाव, बागलकोट, हुबळी-धारवाड, विजापूर जिल्ह्यासह अन्य काही जिल्ह्यांमध्ये खपवण्याचे नियोजन टोळीने केले होते. यासाठी 100 व 500 रुपयांच्या बनावट नोटा छापून घेतल्या होत्या. त्या खपवण्यासाठी त्यांनी प्रत्येकी 100 नोटांचे बंडल बनवले होते. त्या बंडलमध्ये वरची आणि तळाची नोट खरी होती, तर आतील 98 नोटा बनावट होत्या. त्यामुळे हे बंडल खर्‍याच नोटांचे आहे, असे वाटत होते.

Printing fake notes
Gang arrested in Belgaum
धक्कादायक| लासलगावी खाजगी क्लासमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

चार लाखांच्या नोटा जप्त

काही दिवसांपूर्वी हे टोळके एका वाहनात (केए-28 डी-5884) नोटा भरून गोकाकहून बेळगावकडे येत होते. त्यांचे वाहन गोकाक तालुक्यातील कडबगट्टी गावाजवळ आले असता गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवून विचारणा केली. त्याबरोबरच सगळेच भेदरले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी वाहनाची तपासणी केली असता नोटांची बंडले आढळून आली. गोकाकचे पोलीस निरीक्षक गोपाळ राठोड, उपनिरीक्षक किरण एस. मोहिते व त्यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई केली.

Printing fake notes
Gang arrested in Belgaum
हिंगोली: आडोळ येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या वृद्धाविरोधात गुन्हा

पोलीस प्रमुखांकडून कौतुक

गोकाकच्या पोलिसांनी बनावट नोटा बनवणार्‍या टोळीचा छडा लावल्याने त्यांचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी कौतुक केले. सर्वांचे अभिनंदन करताना त्यांना बक्षीस जाहीर केले.

Printing fake notes
Gang arrested in Belgaum
वाशिम: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनाही वाटल्या नोटा खर्‍या

पोलिसांनी संशयितांच्या वाहनांतील नोटा जप्त केल्यानंतर त्यांना त्या नोटा आधी खर्‍या आहेत, असेच जाणवले; परंतु त्या जप्त करून ठाण्यात आणल्यानंतर बनावट असल्याचे स्पष्ट झाले. सापडलेल्या नोटांमध्ये 100 रुपयाच्या 305, तर 500 रुपयाच्या 6,792 नोटा असल्याचे आढळून आले. याची किंमत 3 लाख 70 हजार रुपये होते. याशिवाय शंभरच्या बंडलमध्ये लावलेल्या तसेच या टोळक्याकडे 1 लाखाच्या खर्‍या नोटादेखील आढळून आल्या. या सर्व नोटा व वाहन पोलिसांनी जप्त केले.

Printing fake notes
Gang arrested in Belgaum
औरंगाबाद : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पीडितेच्या वडिलांनी केलेल्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news