Belgaon Black Day: विजय देवणेंसह शिवसेनेच्या २५ कार्यकर्त्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी

कर्नाटक राजोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या २५ कार्यकर्त्यांना उद्या १ नोव्हेंबर रोजी बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.
Maharashtra-Karnataka border dispute
Belgaon Black DayFile Photo
Published on: 
Updated on: 

बेळगाव : मराठी भाग कर्नाटकात समाविष्ट करण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून १ नोव्हेंबर रोजी सीमा भागात परंपरेप्रमाणे काळा दिन पाळण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांच्यासह २५ कार्यकर्त्यांना उद्या १ नोव्हेंबर रोजी बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.

बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या अहवालानुसार, १ नोव्हेंबर रोजी कर्नाटक राजोत्सवाच्या दिवशी, शिवसेना (उद्धव गट) कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांच्यासह सुमारे २५ शिवसेना कार्यकर्ते निपाणी मार्गे बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करून प्रस्तावित काळा दिन पाळण्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे.

Maharashtra-Karnataka border dispute
Karnataka Maharashtra Border Issue : सीमा भागात उद्या काळा दिन

निपाणी-कोगनोळी गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असून, कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यांचा हा प्रस्तावित दौरा आणि कार्यक्रमात सहभागामुळे कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादासंदर्भात चिथावणीखोर भाषणे किंवा वक्तव्ये होऊ शकतात, ज्यामुळे कन्नड आणि मराठी भाषिक समुदायांमध्ये भाषिक तणाव वाढण्याची, सार्वजनिक शांतता भंग होण्याची आणि सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

कोणाला प्रवेशबंदी?

विजय शामराव देवणे - अध्यक्ष, शिवसेना (उद्धव गट), कोल्हापूर जिल्हा

संजय पवार - उपाध्यक्ष, शिवसेना

सुनील मोडी - कोल्हापूर शहर प्रमुख

सुनील शिंत्रे - शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख

विशाल देवकुळे - कोल्हापूर शहर प्रमुख

मंजीत माने - कोल्हापूर जिल्हा शहर प्रमुख

त्यांच्यासोबत येणारे इतर शिवसेना कार्यकर्ते

पोलीस अधीक्षकांच्या अहवालाचा विचार करून आणि कर्नाटक राज्योत्सव साजरा होत असताना कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी, सार्वजनिक शांतता राखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक निर्बंध लादणे आवश्यक असल्याचे मानून, हा आदेश जारी करण्यात आला आहे. बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांना हा आदेश लागू करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Maharashtra-Karnataka border dispute
Mumbai BMW viral video: गाडी थांबव... ट्रॅफिक पोलीस ओरडत होता, तरीही थांबवली नाही; मुंबईत BMW चालवणाऱ्या महिलेचा VIDEO व्हायरल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.