

बेळगाव : अल्पवयीन? ? मुलीवर? ? लैंगिक अत्याचार करून ती गर्भवती झाल्यानंतर तिचा गर्भपात करणार्या नराधमाला पोक्सो विशेष न्यायालयाने 30 वर्षाचा सश्रम करावास आणि 10 हजार रुपये दंड ठोठावला आहे.
नागराज होळ्याप्पा रंगी (वय 23, रा. संती बस्तवाड ता. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. त्याने अल्पवयीन मुलीबरोबर मैत्री करून तिच्याशी सलगी केली होती. त्यानंतर तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केले.
यामुळे ती गर्भवती झाली. त्यानंतर त्यांनी 27 एप्रिल 2023 रोजी तिला रुग्णालयात नेऊन गर्भपात केला. तसेच घटनेची कोणालाही माहिती देऊ नकोस दिल्यास जिवे मारू, अशी धमकी तिला दिली. तथापि, बेळगाव ग्रामीण पोलिसांना मात्र एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलीस अधिकारी मंजुनाथ हिरेमठ यांनी नागराजवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. न्यायालयात 13 साक्षी, 56 कागदोपत्री पुरावे आणि 8 मुद्देमाल तपासले असता आरोपी दोषी आढळला. न्यायाधीश सी. एम.पुष्पलता यांनी त्याला 30 वर्षाचा कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा? ? ठोठावली आहे.
जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाने पीडित मुलीला 4 लाख रुपये देण्याचे आदेशही न्यायाधीशांनी बजावले आहेत. या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.