

खानापूर : एम. के. हुबळी (ता. कित्तूर) येथील मलप्रभा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेतकरी पुनरुज्जीवन पॅनेलने एकहाती सत्ता काबीज केली. पॅनलचे प्रमुख, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह सर्व 15 उमेदवारांनी विजय संपादन केला आहे.
महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पुनरुज्जीवन पॅनलने यंदाच्या निवडणुकीत दंड थोपटले होते. त्यांच्या विरोधात कारखान्याचे माजी चेअरमन नासीर बागवान यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी कामगार कल्याण पॅनेल आणि रयत संघाचे नेते बसवराज मोकाशी यांच्या नेतृत्वाखालील ऊस उत्पादक व कारखाना विकास पॅनेल या दोन पॅनेलनी जोरदार प्रचार करून निवडणुकीत रंग निर्माण केला होता. पण, कारखान्याच्या सभासदांनी पुनरुज्जीवन पॅनेलला पाठिंबा देत सत्तांतर घडवून आणले.
सामान्य गटातून चन्नराज हट्टीहोळी 4731 मते, श्रीकांत इटगी 4424, शिवनगौडा पाटील 4349, शंकर किल्लेदार 4245, श्रीशैल तुरमुरी 4183, रघू पाटील 3829, रामनगौडा पाटील 3735, शिवपुत्रप्पा मरडी 3838, सुरेश हुलीकट्टी 3668 यांनी विजय मिळविला. अनुसूचित जमातीतून भरमाप्पा शिगेहळ्ळी 4161, अनुसूचित जातीमधून बाळाप्पा पुजार 3827, महिला वर्गातून ललिता पाटील 4041, सुनीता लंगोटी 3913, अ वर्गातून फकीराप्पा सक्रेन्नवर 4142, ब वर्गातून शंकराप्पा होळी 4507 यांनी विजय मिळविला.
रविवारी झालेल्या निवडणुकीत 49.45 टक्के मतदान शांततेत झाले. 15 संचालक पदांसाठी एकूण 44 उमेदवार रिंगणात होते. 34 मतदान केंद्रांमधील 16,903 मतदारांपैकी 8,359 शेतकर्यांनी मतदानाचा हक्क बजावला. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर निकाल ऐकण्यासाठी मतदान केंद्रासमोरच गाडीत वाट पाहत बसून होत्या. रात्री उशिरा निकाल जाहीर झाला. खानापूर, कित्तूर आणि बैलहोंगल हे तीन तालुके कार्यक्षेत्र असलेल्या मलप्रभा साखर कारखान्याच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. निवडणूक अधिकारी म्हणून प्रभावती फकिरपूर यांनी काम पाहिले.
खानापूर तालुक्यातून कारखान्यावर सहा जणांची संचालकपदी वर्णी लागली आहे. त्यामध्ये आमदार चन्नराज हट्टिहोळी (चिक्कहट्टिहोळी), श्रीकांत इटगी (चिक्कमुनवळ्ळी), बाळाप्पा पुजार (गंदिगवाड), सुनीता लंगोटी (इटगी), श्रीशैल तुरमुरी (इटगी), ललिता पाटील (चापगाव) यांचा समावेश आहे.
एम. के. हुबळी : विजयानंतर जल्लोष करताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आ. चन्नराज हट्टीहोळी. दुसर्या छायाचित्रात विजयी उमेदवार श्रीकांत इटगी यांच्यासोबत आमदार विठ्ठल हलगेकर विजयाची खूण दाखवताना.खानापूर तालुक्यातून 6 संचालक खानापूर तालुक्यातून कारखान्यावर सहा जणांची संचालकपदी वर्णी लागली आहे. त्यामध्ये आमदार चन्नराज हट्टिहोळी (चिक्कहट्टिहोळी), श्रीकांत इटगी (चिक्कमुनवळ्ळी), बाळाप्पा पुजार (गंदिगवाड), सुनीता लंगोटी (इटगी), श्रीशैल तुरमुरी (इटगी), ललिता पाटील (चापगाव) यांचा समावेश आहे.