

चिकोडी : प्रशासकीयदृष्ट्या व विकासाच्या दृष्टीने डिसेंबर 31 पूर्वी बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून नव्या जिल्ह्यांची घोषणा करावी, अशी मागणी जिल्हा समितीचे अध्यक्ष संजू बडीगेर यांनी केली.
शहरातील सरकारी विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, पुढील वर्षी केंद्र सरकारकडून एप्रिलमध्ये जनगणती प्रक्रिया सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात घरे व लोकवसतीचा सर्व्हे होणार आहे. त्यानंतर 2027 मध्ये फेब्रुवारीपासून जनगणती होणार आहे. त्यामुळे देशातील तालुका जिल्ह्यांच्या सीमा बदल डिसेंबरच्या आत केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारंना सूचना दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारने या वर्षाच्या अखेरीस किंवा त्यापूर्वी नव्या जिल्ह्यांची घोषणा करावी. अन्यथा या सरकारच्या कालावधीत जिल्ह्यांचे विभाजन होणार नाही.
चिकोडी जिल्हा आंदोलन समितीचे सचिव चंद्रकांत हुक्केरी म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून चिकोडी जिल्ह्यासाठी आंदोलन करत आहोत. तरीदेखील जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. सरकारने प्रशासकीयदृष्ट्या चिकोडी जिल्ह्याची निर्मिती करावी. यावेळी रफिक पठाण, मोहन पाटील, संजू हिरेमठ, सचिन दोडमनी, चन्नाप्पा बडीगेर, अनिल नावी आदी उपस्थित होते.