

बेळगाव ः कणबर्गी येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेत गेल्या दीड वर्षापासून मुख्याध्यापक पद रिक्त आहे. त्यामुळे शाळेत अनेक अडचणी येत आहेत. मुख्याध्यापकांसह शिक्षकांची नियुक्ती तातडीने करावी, अन्यथा शाळेला टाळे ठोकू, असा इशारा एसडीएमसी आणि पालकांनी दिला आहे. याबाबत सोमवारी (दि.5) एसडीएमसी व पालकांनी शहर गटशिक्षणाधिकारी रवी बंजत्री यांना निवेदन दिले.
गेल्या दीड वर्षापासून शाळेत मुख्याध्यापकांची नियुक्ती न केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेत पटसंख्या चांगली आहे. मात्र मुख्याध्यापकांसह सहशिक्षकांची नियुक्ती करण्याची गरज आहे. शाळेत लवकर मुख्याध्यापकांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली.
यावेळी एसडीएमसी अध्यक्ष किसन सुंठकर, शिवाजी पाटील, संजय सुंठकर, राजू देसाई, कल्पना कडोलकर, लक्ष्मी मुगुटकर, रचना रजक, कल्पना हलगेकर, गीता कंग्राळकर, सानिका चौगुले, सुनीता मुंचडीकर आदी उपस्थित होते.