49 लाखांचे गोवा मद्य जप्त

अबकारी खात्याची कारवाई; महाराष्ट्राचे लेबल लावून नेण्याचा प्रकार
Alcohol Seized In Belgaon
बेळगाव ः जप्त केलेल्या मद्याबाबत माहिती देताना अबकारी खात्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ. बाजूला अबकारी खात्याचे सहआयुक्त एफ. एच. चलवादी, उपायुक्त कु. वनजाक्षी एम. आदी.Pudhari Photo
Published on
Updated on

बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा

49 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य, 35 लाखांचे सहाचाकी अवजड वाहन व 30 हजारच्या प्लास्टिकच्या बादल्या असा 84 लाख 26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास कणकुंबीजवळ राज्य अबकारी खात्याने ही कारवाई केली. अबकारी खात्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. विशेष म्हणजे अबकारी खात्याने जे मद्य पकडले आहे, ते गोवा येथेच तयार करून घेतले आहे. परंतु, प्रत्येक बाटलीवर नॉट फॉर सेल इन गोवा असे लिहून त्यावर ग्रीन व्हिस्की असे महाराष्ट्रात तयार होणार्‍या मद्याचे स्टीकर चिकटवले आहे.

Alcohol Seized In Belgaon
Beed News | बियर बार फोडून चोरट्यांनी पावणे दोन लाखाची दारू पळविली

डॉ. मंजुनाथ म्हणाले, सहाचाकी आयशर वाहनातून प्लास्टिकच्या बादल्या भरून येत असल्याची माहिती कणकुंबी चेकपोस्टवरील अधिकारी व कर्मचार्‍यांना मिळाली. त्यांनी टेम्पोत भरलेल्या बादल्या पाहिल्या. यामध्ये काहीही वावगे नव्हते. परंतु, टेम्पोची आतून व बाहेरून लांबी मोजली असता बाहेरच्या तुलनेत आतील लांबी कमी भरली. यावेळी आतील बाजूस आणखी एक कप्पा करण्यात आल्याचा संशय आला. हा कप्पा उघडून पाहिला असता यामध्ये 255 बॉक्स आढळून आले. या बॉक्समध्ये एकूण 3060 मद्याच्या बाटल्या असून हे मद्य 2295 लिटर होते. याची किंमत बाजारभावानुसार 48 लाख 96 हजार इतकी होते. हे मद्य, वाहन व अन्य साहित्य जप्त केले. या वाहनावरील चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.

डॉ. मंजुनाथ, अबकारी खात्याचे सहआयुक्त एफ. एच. चलवादी, उपायुक्त कु. वनजाक्षी एम., अबकारी अधीक्षक विजयकुमार हिरेमठ, जगदीश कुलकर्णी, उपअधीक्षक रवी मुरगोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मंजुनाथ मळ्ळीगेरी यांनी ही कारवाई केली. या कारवाईत कणकुंबी विभागाचे निरीक्षक बाळगौडा पाटील, उपनिरीक्षक मल्लाण्णा निलजकर, पोलिस के. बी. कुरहट्टी, आप्पासाहेब कांबळे यांनी सहभाग घेतला.

Alcohol Seized In Belgaon
परभणी : रावराजूरात रणरागिणींनी उध्वस्त केले अवैध दारू विक्रीचे अड्डे

निवडणुकीची तयारी?

महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. गोव्याचे मद्य घेऊन त्यावर महाराष्ट्रातील लेबल लावून ते विकण्याचा बहुदा प्रयत्न होता. गोव्यातील स्वस्तातील मद्य नसून हे महाराष्ट्रातीलच आहे, असे भासवण्याचा हा प्रकार पोलिसांनी हाणून पाडला आहे. हे मद्य निवडणुकीसाठी नेण्यात येत होते का, या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news