Beed News | बियर बार फोडून चोरट्यांनी पावणे दोन लाखाची दारू पळविली

केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
Beed News
बियर बार फोडून चोरट्यांनी पावणे दोन लाखाची दारू पळविलीfile photo
Published on
Updated on
गौतम बचुटे

केज (बीड) : केज येथे चोरट्यांनी महामार्गावर असलेल्या एका बिअर बारचे कुलूप कटरने कापून सुमारे १ लाख ७८ हजार रूपये किमतीची विदेशी दारू चोरून नेली. रघुनाथ थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसारन केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, केज येथे केज-मांजरसूंबा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८-डी वर असलेल्या रेणू पेट्रोल पंपाच्या शेजारी रघुनाथ अभिमान थोरात यांचे रेणू बियर बार व हॉटेल आहे. शनिवारी २८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १२ वा. च्या सुमारास हॉटेलचे मॅनेजर गौरव महिंन्द्र दास व ७ ते ८ कामगार हॉटेलची दारे कुलूप लावून बंद करून हॉटेलच्या स्टाफरुमध्ये झोपले होते. मध्यरात्री चोरट्यांनी हॉटेलच्या दरवाजाचे दोन्ही बाजूची कुलुपे कटरने कापून बियरबार असलेल्या गोडाऊनमधील विदेशी मद्याचे १ लाख ७८ हजार ५८० रूपये किमतीचे २७ बॉक्स चोरून नेले. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी दोन्ही दरवाजे बाहेरून बंद केले होते. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल त्रिंबक सोपणे हे तपास करीत आहेत.

Beed News
Beed News | सासऱ्याच्या प्रेमविवाहाची सुनेला शिक्षा; सात पिढ्या बहिष्कृत!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news