Chitradurga Accident महिला डीवायएसपी जखमी; आई, चालक ठार

चित्रदुर्गजवळील घटना : वैष्णवी पाटील बचावल्या; 3 जखमी, मोटारीचा चक्काचूर
Chitradurga Accident News
महिला डीवायएसपी जखमी; आई, चालक ठार
Published on
Updated on

बंगळूर : तामिळनाडूतील रामेश्वर येथील देवदर्शन आटोपून परतणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कोल्हापूर येथील पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मोटारीचा कर्नाटकात चित्रदुर्ग-कलबुर्गी महामार्गावर रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वैष्णवी पाटील यांच्या वृद्ध माता, चालक जागीच ठार झाले. कमल हरिभाऊ पाटील (वय 69, रा. कांदे, ता. शिराळा), राकेश अर्जुन ऐवळे (वय 39, रा. निपाणी) अशी त्यांची नावे आहेत. उपअधीक्षक वैष्णवी सुरेश पाटील (45, कळंबा रोड, कोल्हापूर), कुसुम प्रल्हाद पाटील (57, रा. कांदे, शिराळा), कॉन्स्टेबल उदय दत्तात्रय पाटील (38, रा. कौलव, ता. राधानगरी, सध्या रा. कोल्हापूर) गंभीर जखमी झाले.

Chitradurga Accident News
Truck Accident News | भरधाव ट्रकच्या धडकेत अर्जुनवाडचा युवक ठार

या भीषण अपघातात जखमी झालेल्या उपअधीक्षक पाटील, त्यांच्या चुलती कुसुम पाटील व लाचलुचपत प्रतिबंध पथक विभागातील कॉन्स्टेबल उदय पाटील यांना चित्रदुर्ग येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दुर्घटनेत पोलिस उपअधीक्षक पाटील यांच्या मातेसह चालकाचा जागीच मृत्यू झाल्याचे चित्रदुर्गचे पोलिस उपअधीक्षक दिनकर पी. के. यांनी पत्रकारांना सांगितले. चित्रदुर्ग- कलबुर्गी महामार्गावर कोल्हापूरकडे परतणारी भरधाव मोटार ट्रकवर जोरात आदळली. धडक होताच मोटारीतील एअर बलूनमुळे वैष्णवी पाटील बचावल्या; मात्र चालकासह त्यांच्या मातेचा अंत झाला.

उपअधीक्षक पाटील यांच्या मोटारीचा भीषण अपघात झाल्याची बातमी सकाळी शहरात पसरली. कोल्हापूरसह राधानगरी तालुक्यातील चंद्रे, सांगली जिल्ह्यातील शिराळा, कांदे, मांगले परिसरातील नातेवाईक तसेच वैष्णवी पाटील यांचे पती सुरेश पाटील रविवारी दुपारी चित्रदुर्ग येथे दाखल झाले. उपअधीक्षकांसह जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.

उपअधीक्षक पाटील, वृद्ध माता, चुलतीसह पाचजण शुक्रवारी सकाळी मोटारीने तामिळनाडू येथील देवदर्शनासाठी रवाना झाले होते. देवदर्शन आटोपल्यानंतर शनिवारी रात्री सर्वजण कोल्हापूरकडे परत येत होते. चित्रदुर्ग- कलबुर्गी महामार्गावर पहाटे साडेचारला मोटार ट्रकवर जोरात आदळली. धडक होताच क्षणी मोटारीतील एअर बलून फुटल्याने वैष्णवी पाटील बचावल्या. कमल पाटील, चालक राकेश ऐवळे गंभीर जखमी झाले. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

महामार्गावरील भीषण अपघातानंतर चित्रदुर्ग पोलिस उपअधीक्षक दिनकर पी.के. यांच्यासह स्थानिक अधिकारी, पोलिस, राष्ट्रीय महामार्ग वाहतूक पोलिस, महामार्गावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक, रुग्णवाहिका दाखल झाल्या. बचावकार्यात स्थानिक नागरिकही सहभागी झाले होते. मृत आणि जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. वैष्णवी पाटील यांच्या मातेसह चालकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. जखमींना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्याचे उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.

कारचा चक्काचूर

कारने ट्रकला दिलेली धडकी इतकी जोरदार होती की तिच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी आणि मृतांना कारमधून बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यासाठी त्यांनी पोलिसांना मदत केली. या अपघातामुळे रहदारी दोन तासाहून अधिकवेळ ठप्प होती.

एकुलत्या मुलाच्या मृत्यूने ऐवाळे कुटुंबियांना धक्का

राकेश ऐवाळे हे गेल्या अनेक वर्षापासून वैष्णवी पाटील यांच्या कारवर चालक म्हणून सेवेत होते. चार दिवसापूर्वी ते वैष्णवी पाटील यांच्या कुटुंबियांसमवेत देवदर्शनासाठी चित्रदुर्ग परिसरात गेले होते.तेथून परतत असताना त्यांच्या कारला चित्रदुर्ग-गुलबर्गा मार्गावर रविवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात राकेश ऐवाळे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन जुळी मुले, आई, वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्यांचे वडील अर्जुन ऐवाळे सेवानिवृत्त शिक्षक असून एकुलत्या एका मुलाचामृत्यू झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

Chitradurga Accident News
Satara Accident: उसाच्या ट्रॉलीखाली सापडून दुचाकीस्वार ठार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news