

शिरोळ : कृष्णाघाट (ता. मिरज) येथील स्मशानभूमीजवळ ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील वेदांत मल्हारी कुडचे (वय 18) हा युवक जागीच ठार झाला. अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून, या घटनेची नोंद मिरज पोलिस ठाण्यात झाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळच्या सुमारास कृष्णाघाट स्मशानभूमी परिसरात मालवाहू ट्रक आणि दुचाकी यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत वेदांत गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर काहीकाळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करत पुढील कारवाई सुरू केली. वेदांतच्या अकाली मृत्यूमुळे अर्जुनवाड गावात शोककळा पसरली आहे. नातेवाईक, मित्र परिवार व ग्रामस्थांनी रुग्णालयात तसेच घरी गर्दी केली होती.