केंद्रस्तरावर 'फणस, चिंच बोर्ड' स्थापन करा

National Jackfruit and Tamarind Board| -माजी पंतप्रधान देवेगौडा : फणस उत्पादकांकडे दुर्लक्ष झाल्याची खंत
बंगळूर पंतप्रधान महोत्सवात फळांची पाहणी करताना माजी देवेगौडा.
बंगळूर पंतप्रधान महोत्सवात फळांची पाहणी करताना माजी देवेगौडा.
Published on
Updated on

बंगळूर : देशातील फणस, चिंच आणि जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना संस्थात्मक पाठबळ मिळवून देण्यासाठी केंद्रीय स्तरावर स्वतंत्र राष्ट्रीय बोर्ड स्थापन करण्यात यावा, अशी मागणी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी केली आहे. बंगळूरमधील प्रसिद्ध लालबाग बॉटनिकल गार्डनमध्ये सुरु असलेल्या 'आंबा आणि फणस महोत्सवाला' त्यांनी रविवारी (दि. ७) भेट दिली. याप्रसंगी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

बंगळूर पंतप्रधान महोत्सवात फळांची पाहणी करताना माजी देवेगौडा.
बंगळूर दक्षिणमध्ये दुसरा 'डीकेएस' अशक्य

या मागणीसाठी मी स्वतः केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विविध स्टॉल्सची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, या महोत्सवाचे निमंत्रण दिले, तेव्हा दोन्ही फळांना समान प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी मी आज येथे आलो, असे त्यांनी नमूद केले.

बंगळूर पंतप्रधान महोत्सवात फळांची पाहणी करताना माजी देवेगौडा.
Pro-Kannada Border Resolution |सीमाप्रश्नी कन्नडधार्जिणा ठराव मांडणार कोण?

या भेटीदरम्यान रामनगर, कोलार, चिक्कबळ्ळापूर, देवणहळ्ळी आणि मांड्या परिसरातील शेतकऱ्यांनी आणलेला उच्च दर्जाचा फणस पाहण्यास मिळाला. फणसाच्या गऱ्यांचा वापर करण्यापासून ते फणसाच्या बियांचा स्वयंपाकात वापर करण्यापर्यंत किंवा रोजच्या आहारात चिंचेचा समावेश करण्यापर्यंत, ही पिके ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहेत. परंतु, या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी मोठ्या संस्थात्मक आणि सरकारी पाठबळाची गरज आहे, असे देवेगौडा यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news