

बेळगाव : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 3) रामतीर्थनगर येथे रात्री 8.30 सुमारास घडली. बसवराज फकिरप्पा मुरकुंबी (वय 55, मूळगाव हुलीकट्टी, ता. कित्तूर, सध्या रा. रामतीर्थनगर बेळगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
बसवराज हे गवंडी काम करत होते. उशिरापर्यंत काम संपवून ते दुचाकीवरून परतत होते. रामतीर्थनगर येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू होती. यावेळी समोरून येणाऱ्या आणि त्यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात बसवराज यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघे जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उत्तर रहदारी पोलिस स्थानकाचे पोलिस पुढील तपास करत आहेत.