बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारी रेजीमेंट म्हणून ‘मराठा लाईट इन्फंट्री’ची देशात ओळख : लेफ्टनंट कर्नल अजय सिंग

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारी रेजीमेंट म्हणून ‘मराठा लाईट इन्फंट्री’ची देशात ओळख : लेफ्टनंट कर्नल अजय सिंग

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून लढवय्या मराठा अग्रेसर राहिला आहे. पहिल्या महायुद्धात देखील मराठ्यांनी लढवय्यापणा दाखवला होता. कर्तव्य, मान, साहस या नीतीवर मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान कार्यरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारा मराठा म्हणून 'मराठा लाईट इन्फंट्री'ची देशात वेगळी ओळख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल अजय सिंग यांनी केले. रविवारी बेळगाव येथे १७ वा माजी सैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

अतुलनीय पराक्रमाची २५० वर्षांची वैभवशाली परंपरा असणाऱ्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे दि १५ पासून १७ ऑक्टोबर पर्यंत १७ वा युद्धोत्तर पुनर्मिलन सोहळा (पोस्टवॉर री-युनियन) साजरा होत आहे. या सोहळ्याला रविवारी लष्कर, नौदल, हवाईदल व तटरक्षक दलाच्या सर्व संलग्न युनिट्समधील अधिकारी वर्गाने हजेरी लावली. तसेच सात तुकडी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बॉम्बे, इंजिनीअर ग्रुप ३ एअरफोर्सचे प्रतिनिधित्व करणारी एकरमन ट्रेनिंग स्कूल सांबरा, इंडिया स्टेशन (दमण) यांच्यासह लष्कराचा CON मराठा लाइट सिल्हर बॅण्ड सहभागी झाले होते.

यावेळी माजी लष्करप्रमुख जनरल जे. जे. सिंग, मेजर जनरल के. नारायणन यांच्यासह भारत सरकार संरक्षण मंत्रालय निवृत्त लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल, कोल्हापूर व तंजावरचे राज घराणे, इन्फंट्रीचे सेवानिवृत्त अधिकारी आदी उपस्‍थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news