Belgaum Ganpati Visarjan: बाप्पाला आज निरोप : विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी

पाच हजार पोलिस, दीड हजार सीसीटीव्ही; १२ ड्रोन कॅमेऱ्यांचीही राहणार नजर
Belgaum Ganpati Visarjan: बाप्पाला आज निरोप : विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी
Published on: 
Updated on: 

बेळगाव : शुक्रवारी लाडक्या बाप्‍पाला निरोप देण्यात येणार असून त्यासाठी निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त असून १५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याशिवाय १२ ड्रोन कॅमेरे, १८ व्हिडिओग्राफर मिरवणुकीवर नजर ठेवून राहणार आहेत.

जिल्हा पोलिस परेड मैदानावर राज्यभरातून आलेल्या पोलिसांची ओळखपरेड झाली. त्यांना बंदोबस्तासंबंधी सूचना देण्यात आल्या. बंदोबस्तासाठी बाहेरून दोन आयपीएस अधिकारी आलेले आहेत. याशिवाय स्थानिक अधिकारी व पोलिस, आयजीपी परिक्षेत्रातील पोलिस व बाहेरून आलेले पोलिस असा सुमारे ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.

पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, बंदोबस्ताची सर्व ती तयारी करण्यात आली असून मंडळांनी कायदा हाती न घेता शांततेत मिरवणूक काढावी शहरातील सर्व सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांनी वेळेत विसर्जन होईल, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे आवाहनही पोलिस आयुक्त निकम यांनी केले. न्यायालयीन आदेशानुसार डीजेवर बंदी राहणार आहे. शिवाय कोणी प्लाझ्मा, एलईडी अशा लायटिंगचा वापर करत असेल तर ते जप्त केले जाईल, असा पुन्हा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.

असा असेल एकूण बंदोबस्त

तीन डीसीपी, ६ एसीपी, २१ पोलिस निरीक्षक, १५३ पोलिस निरीक्षक, ८३० उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल व कॉन्स्टेबल बाहेरून आलेले ४ जिल्हा पोलिस प्रमुख, २२ उपअधीक्षक, ७३ निरीक्षक, २५५ पीएसआय, एएसआय, २००० हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल, ४०० होमगार्डस्श हरात १५०० सीसीटीव्ही, मिरवणूक मार्गावर तसेच संवेदनशील ठिकाणी ५४३ सीसीटीव्ही कॅमेरे, मिरवणूक मार्गावर १२ ड्रोन व १८ व्हिडिओग्राफर आकस्मिक घटना घडल्यास त्यासाठी चार स्वतंत्र पथके. शिवाय आठ रुग्णवाहिका व पाच अग्निशामक वाहने थांबणार

प्रतिबंधात्मक कारवाई : २४ जण तडीपार, ९९२ जणांकडून बॉंंड लिहून घेतला सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश तपासणी, त्यावर नजर ठेवण्यासाठी १३ पथकांची नियुक्ती, डॉल्बी व आवाजावर नियंत्रण आहे का हे पाहण्यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विशेष पथक नियुक्त, मिरवणुकीतील एखादे वाहन रस्त्यावर बंद पडल्यास मेकॅनिकल टीम तयार, शिवाय चालकांचीही टीम कार्यरत, शहरातील ३२ सेक्टरमध्ये ३३ शक्ती वाहने, १५ होयसळ व ९ हायवे पेट्रोलिंगची वाहने गस्तीवर, महापालिका, हेस्कॉम, वनखाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही तयारी, गणेशभक्तांच्या सोयीसाठी व सुरळीत वाहतुकीसाठी १०० ठिकाणी बॅरिकेडस्‌ व ८ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था, शहरातील वाहतूक मार्गात बदल करून पर्यायी मार्गाची व्यवस्था.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news