बेळगाव : निपाणीत सोमवारी शिवपुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

बेळगाव : निपाणीत सोमवारी शिवपुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
Published on
Updated on

निपाणी : पुढारी वृत्तसेवा : मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे यावर्षी भव्य प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. शिवजयंतीनिमित्त यंदा इतिहासात प्रथमच सोमवारी (दि.२) सकाळी ९ वाजता शिव पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सतीशअण्णा जारकीहोळी यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी श्रीमंत दादाराजे देसाई निपाणीकर -सरकार यांच्या हस्ते शिव पुतळ्यास अभिषेक, जिजामाता महिला मंडळाकडून पाळणा सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर ही पुष्पवृष्टी केली जाणार असल्याची माहिती स्वराज्य रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिली.

दरम्यान, शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर निपाणीत मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी पोलीस प्रशासनाच्यावतीने शहरातील विविध मार्गावरून पथसंचलन करण्यात आले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news