

चिकोडी : गेल्या काही दिवसांपासून विविध भागांत भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात दोन वर्षीय बालक गंभीर जखमी झाले. सदर घटना शहरातील व्यंकटेश गल्लीत घडली. ऋत्विक आनंद कुदरे असे बालकाचे नाव आहे.
बुधवारी सकाळी सुमारे चार भटक्या कुत्र्यांनी ऋत्विकवर हल्ला केला. यात सदर बालक गंभीर जखमी झाले आहे. ही घटना अंगणवाडीपासून जवळच घडली. बालकावर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. नगरपरिषदेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.