

खानापूर : अन्य धर्मीय तरुणाचे आपल्या समाजातील युवतीसोबत असलेले प्रेमसंबंध सहन न झाल्याने तरुणाला बेदम मारहाण करणाऱ्या नंदगडमधील (ता. खानापूर) 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.
बेळगाव तालुक्यातील एका गावातील युवकाचे त्याच गावातील अन्यधर्मीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. धर्म वेगवेगळे असल्याने तरुणीच्या घरच्यांनी त्यांना विरोध केला. तरुणीचे मन परिवर्तन करण्यासाठी तिला काही दिवसांसाठी नंदगडमधील बहिणीच्या घरी पाठविले. त्या ठिकाणी तरुणीला भेटण्यास गेलेल्या युवकाला तरुणीचे नातेवाईक असलेल्या पाचजणांनी बेदम मारहाण केली. नंदगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी जावेद इस्माईल मुल्ला, मोहम्मदताबीत कासिमसाब सकली, आयान गजबरसाब जांबोटी, रमीझ रोशनजमीर सय्यद, वाहिद मोहम्मदशरीफ सकली यांना अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. जखमी युवकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस निरीक्षक रवीकुमार धर्मट्टी पुढील तपास करत आहेत.