

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्यावतीने काढण्यात येणाऱ्या मराठी सन्मान यात्रेची सुरुवात स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरून दि. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी सुरू होणार आहे. प्रजासताक दिनाचे औचित्य साधून यात्रेला प्रारंभ करण्याचा निर्णय मराठा मंदिरात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके होते.
मराठी सन्मान यात्रेच्या नियोजनासंदर्भात बैठक पार पडली. ज्या कोणी कार्यकर्त्यांना या सन्मान यात्रेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी 20 जानेवारीपर्यंत नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले. नावनोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीला अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर, अशोक घगवे, मोतेश बारदेशकर, सागर सांगावकर, अभिजीत मजुकर, इंद्रजित धामणेकर, सुधीर शिरोळे, रमेश माळवी, सुरज जाधव, राजू पाटील, अभिषेक कारेकर, प्रवीण नावगेकर, रिचर्ड अंथोनी आदी उपस्थित होते.