बेळगाव : बैलहोंगल येथे जुगार खेळणाऱ्या ७० जणांना अटक

बेळगाव : बैलहोंगल येथे जुगार खेळणाऱ्या ७० जणांना अटक

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : बैलहोंगल येथील एका बार अँड रेस्टॉरंटच्या टेरेसवर जुगार खेळणाऱ्या ७० जणांना अटक केली. त्यांच्याकडून २ लाखांची रक्कम जप्त केली. रविवारी (दि.५) सायंकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई जिल्हा सीएन विभागाने केली.

बैलहोंगल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक बार अँड रेस्टॉरंट आहे. याच्या टेरेसवर जुगार सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन येथे छापा टाकला. तत्पूर्वी त्यांनी बाहेर पडण्यासाठी असणारा एकमेव मार्ग बंद केला. त्यानंतर वरती बसलेल्या सर्व जुगाऱ्यांना एकेक करत खाली घेऊन त्यांना पोलीस वाहनात घातले. रात्री उशिरा या सर्वांना बेळगावातील जिल्हा सीएन कार्यालयात आणून त्यांची हजेरी घेण्यात आली. या प्रकरणी रात्री उशिरा पर्यंत कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news