

बेळगाव : वेतन वाढीसह इतर मागण्यांसाठी आशा कार्यकर्त्यांनी तीन दिवस आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला यश मिळाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने आशा कार्यकर्त्यांच्या मासिक मानधनात 1500 रूपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही वाढ लागू केली जाणार आहे, असे आश्वासन आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली आहे.
आशा कार्यकर्त्यांनी किमान मासिक 10 हजार रूपये मिळावे, यासाठी फेब्रवारी दरम्यान बंगळूर फ्रीडम पार्कवर आंदोलन केले होते. त्यानंतर आता पुन्हा 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान आंदोलन छेडले होते. याची दखल घेऊन 1500 रुपये अतिरिक्त मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या राज्य सरकारने दिलेले 5000 रूपये आणि केंद्र व राज्य सरकारने 3000 रुपये असे एकूण 8000 रूपये दिले जात आहेत. त्यामुळे आता किमान 9500 रूपये मानधन मिळेल, असे आश्वासन सरकारने दिले आहे.