लाडकी बहीण पाठोपाठ आशा सेविकांना मोबाईल आणि रिचार्जही !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली घोषणा
Asha Sevika will get mobile and recharge!
लाडकी बहीण पाठोपाठ आशा सेविकांना मोबाईल आणि रिचार्जही !Pudhari Photo
Published on
Updated on

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकारने आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महिला मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आता लाडकी बहीण योजनेसोबतच आशा सेविकांना देखील निवडणूकपूर्व एक भेट दिली आहे. मोबाईलसोबतच त्यांना आता रिचार्जचीही व्यवस्था सरकारने केली आहे. या संबधीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

खनिज विकास निधीमधून वर्षभर रिचार्जची ही रक्कम दिली जाईल, या विषयीची मागणी गेले अनेक दिवस केली जात होती. यासोबतच वाढीव मानधन संदर्भात जीआर निघाला, मात्र अजून पैसे मिळाले नाहीत अशी तक्रार लक्षात घेता या महिन्यात ते पैसे जमा होतील असेही आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

नागपूर जिल्ह्यातील आशा सेविकांकरिता मोबाईल वितरण तसेच पारशिवनी तालुक्यातील घाटपेंढरी व काटोल तालुक्यातील झिल्पा व भोरगड येथील नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. आशा सेविकांना मोबाईल व टॅब मिळाल्याने त्यांचे ग्रामीण भागात आरोग्य सेवेचे काम गतिमान होऊन अधिकाधिक माता-भगिणी, बालकांसह नागरिकांना सरकारी आरोग्य सेवांचा लाभ कमीत कमी वेळेत मिळेल. या सोबतच तीन नवीन आरोग्य केंद्र नागरिकांच्या सेवेत सुरू झाल्याने नागपूर जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा विस्तार झाला आहे. हे दोन्ही उपक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने प्रत्यक्षात उतरले आहेत.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जि.प.च्या अध्यक्ष मुक्ताताई कोकड्डे, रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, आ. अनिल देशमुख, आ. आशिष जयस्वाल, आ. डॉ. परिणय फुके, आ. टेकचंद सावरकर, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर आडबले, आ. कृपाल तुमाने, यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा व आरोग्य विभागातील अधिकारी व आशा सेविका उपस्थित होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news