बेळगाव : चोर्ला घाटातील अपघातात युवकाचा मृत्यू

कारने झाडाला दिलेल्या धडकेत बेळगावचा तरुण ठार
Accident In Chorla Ghat One died On Spot
चोर्ला घाटातील अपघातात युवकाचा मृत्यूPudhari Photo
Published on
Updated on

खानापूर, पुढारी वृत्तसेवा : मित्रांसोबत गोव्याला जात असताना कारचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आपटली. या अपघातात संकेत बबन लोहार (वय. 26 रा. दुर्गामाता रोड, गांधीनगर, बेळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Accident In Chorla Ghat One died On Spot
Nashik Accident | गंगापूर धरण परिसरात पर्यटकांच्या कारचा अपघात, एकाचा मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, संकेत मित्रांसोबत गोव्याला जात होता. दरम्यान कारची रस्त्याकडेला धोकादायक स्थितीत असलेल्या झाडाला धडक बसली. या अपघातात संकेतचा जागीच मृत्यू झाला. चोर्ला घाटातील केरी जवळ हा अपघात घडला. तो आपल्या अन्य दोन मित्रांसोबत काही कामानिमित्त गोव्याला जात होता. त्याचा मित्र कार चालवत होता. तर संकेत चालकाच्या बाजूला बसला होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने झाडाला धडक दिली. चालकाशेजारी बसलेला संकेत गंभीर जखमी झाला. रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने इतर दोघेजण बचावले. या घटनेची वाळपई पोलिस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news