Nashik Accident | गंगापूर धरण परिसरात पर्यटकांच्या कारचा अपघात, एकाचा मृत्यू

कार थेट गोदावरी नदीपात्रात कोसळली
गंगापूर धरण परिसरात पर्यटकांच्या कारचा अपघात, एकाचा मृत्यू
गंगापूर धरण परिसरात पर्यटकांच्या कारचा अपघात, एकाचा मृत्यू Pudhari Photo

पुढारी ऑनलाइन डेस्क; नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात पर्यटकाच्या कारचा अपघात झाला आहे. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तर दोन जण गंभीर जखमी आहेत. या अपघातात कार थेट गोदावरी नदीपात्रात कोसळली. रात्रीच्या अंधारात हा अपघात झाला.

Summary
  • गोदावरी नदीच्या पुलाजवळ रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.

  • अपघातात कार थेट गोदावरी नदी पात्रात पडली.

  • यात एका पर्यटकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

  • दोघांना बाहेर काढण्यात आले आहे.

  • त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

नाशिकच्या हॉटेल गंमत जमंत च्या परिसरात हा अपघात झाला. जवळपास तीघे जण कारमध्ये होते. त्यात एकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पर्यटक घरी परतत असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news