चंदगड : भीषण अपघातात इटगीचा ट्रक चालक जागीच ठार; दोनजण जखमी

चंदगड : भीषण अपघातात इटगीचा ट्रक चालक जागीच ठार; दोनजण जखमी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव-वेंगुर्ला राज्य मार्गावर चंदगड जवळील नागनवाडी (ता. चंदगड) येथे भीषण अपघात. ट्रक चालक जागीच ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अर्जुन कत्याप्पा बडली (वय 50, रा. इटगी, ता. खानापूर, जि. – बेळगाव) असे मृत झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.

ट्रक चालक जागीच ठार

माहितीनुसार, सावंतवाडीहून चिऱ्याने भरलेला ट्रक वेगाने चंदगड मार्गे बेळगावच्या दिशेने येत होता. बुधवारी (दि.१२) रात्री दहा वाजता  बेळगाव-वेंगुर्ला राज्य मार्गावर चंदगड जवळील नागणवाडीजवळ वळणाचा अंदाज न आल्याने समोरून येणाऱ्या कारला चुकविण्यासाठी ट्रक चालकाने ब्रेक मारला.  ट्रक इतका वेगात होती की गाडी चालकाच्या उजव्या दिशेने रस्ता सोडून जाऊन उलटून समोरून येणाऱ्या कारला धडकला. त्यामुळे ट्रक उलटून चालक जागीच ठार झाला. यावेळी समोरून येणाऱ्या कार मधील दोघेजण जखमी झाले आहे.

कारमधील प्रवासी बेळगाव येथे औषधोपचार घेऊन ते आपल्या देवगड या गावी जात होते.सदर अपघात बुधवारी ( दि. 12) रात्री दहा वाजता झाला असून यामध्ये ट्रकचालक अर्जुन कत्याप्पा बडली (वय 50, रा. इटगी, ता. खानापूर, जि. – बेळगाव) जागीच ठार झाला आहे. तर कारमधील जोत्स्ना संकेत लब्दे (वय ५५), विकास राऊत (दोघेही रा. देवगड, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग ) हे दोघेजण जखमी झाले आहेत.

ट्रकच्या केबिनमध्ये ट्रक चालकाचा मृतदेह अडकून पडला होता. चालकाला गावातील तरुणांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण रात्री उशिरापर्यंत सदर ट्रक चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले नाही. याबाबतची फिर्याद कारमधील जखमी प्रवाशांचे नातेवाईक गणेश भिकाजी कोयंडे (वय 42, रा. देवगड, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. अधिक तपास चंदगड पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news