बेळगाव: मराठा गोल्फ चषक स्पर्धेत मिहीर पोतदारने पटकावला प्रथम क्रमांक | पुढारी

बेळगाव: मराठा गोल्फ चषक स्पर्धेत मिहीर पोतदारने पटकावला प्रथम क्रमांक

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटर २०२४ आयोजित मराठा चषक गोल्फ स्पर्धा पीटीए गोल्फकोर्टवर दि. १७ व १८ फेब्रुवारी दरम्यान संपन्न झाल्या. या स्पर्धेत मिहीर पोतदार यांनी मातब्बर अशा खेळाडूंना मात देत मराठा गोल्फ चषकावर नाव कोरले. पोतदार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेमध्ये बेळगावसह, बेंगळूर, हुबळी, कोल्हापूर येथील १८६ नामांकित स्पर्धेकांनी भाग घेतला होता.  Maratha Golf Cup

या स्पर्धेमध्ये येथील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि उत्तम खेळाडू अनिल पोतदार यांचे चिरंजीव मिहीर पोतदार यांनी मातब्बर अशा खेळाडूंना मात देत मराठा गोल्फ चषक पटकावला. बक्षीस वितरण प्रसंगी एमएलआरसी कामाडंट ब्रिगेडीअर जॉयदीप मुखर्जी आदीसह  अधिकारी वर्ग, गोल्फपटू उपस्थित होते. Maratha Golf Cup

हेही वाचा 

Back to top button