Belgaum : प्रगतिशील लेखक संघाचे मराठी साहित्य संमेलन २८ जानेवारी रोजी | पुढारी

Belgaum : प्रगतिशील लेखक संघाचे मराठी साहित्य संमेलन २८ जानेवारी रोजी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : येथील प्रगतिशील लेखक संघाचे तिसरे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. २८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. पुणे येथील अन्नपूर्णा महिला परिवारच्या अध्यक्षा डॉ. मेधा पुरव – सामंत (पुणे) यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. याबाबतची माहिती संघाचे अध्यक्ष व निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे यांनी गुरुवारी (दि. १४) झालेल्या बैठकीमध्ये दिली.

नामवंत साहित्यिक, नाटककार व पत्रकार आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून आचार्य अत्रे यांचे विविध क्षेत्रातील कार्य ही संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना राहाणार आहे. चार सत्रात हे संमेलन होणार आहे. पहिल्या दोन सत्रात आचार्य अत्रे यांच्या साहित्य व पत्रकारितेवर आधारित व्याख्याने होणार आहेत. दुपारच्या सत्रात परिसंवाद व निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. प्रगतिशील लेखक संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संमेलनाची रूपरेषा ठरविण्यात आली.

हेही वाचा : 

 

Back to top button