

निपाणी, पुढारी वृत्तसेवा: बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री. हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याची ८ वी पंचवार्षिक निवडणूक शुक्रवारी (दि.८) बिनविरोध झाली. १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती निर्वाचन अधिकारी अनिल मोरब यांनी दिली. मल्टीस्टेट कायद्यानुसार बिनविरोध निवडीची घोषणा १६ सप्टेंबररोजी होणाऱ्या वार्षिक सभेत केली जाणार आहे. (Halsiddhanath Sugar Factory)
बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे सामान्य 'अ' गटातून आप्पासाहेब जोल्ले (एकसंबा), अविनाश पाटील (नांगनूर), जयकुमार खोत (शमणेवाडी), जयवंत भाटले (निपाणी), एम. पी. पाटील (जत्राट), पवनकुमार पाटील (मांगुर), प्रकाश शिंदे (भिवशी), रामगोंडा पाटील (जनवाड), रमेश पाटील (बेनाडी), रावसाहेब फराळे (अकोळ), समित सासणे (पडलीहाळ), शरद जंगटे (बोरगाव), सुकुमार पाटील (बुदीहाळ), विनायक पाटील (रामपूर), विश्वनाथ कमते (खडकलाट) एससी गटातून सुहास गुगे (अकोळ), महिला गटातून गीता सुनील पाटील (निपाणी), वैशाली किरण निकाडे (कुरली), ओबीसी गटातून श्रीकांत बन्ने (गळतगा) बिगर ऊस उत्पादक 'ब' गटातून राजू गुंदेशा (निपाणी) यांची बिनविरोध निवड झाली. (Halsiddhanath Sugar Factory)
अर्ज माघार घेणाऱ्यांमध्ये कारखान्याचे विद्यमान चेअरमन चंद्रकांत कोठीवाले, ज्येष्ठ संचालक पप्पूअण्णा पाटील, किरण निकाडे, राजाराम खोत व रुद्रकुमार कोठीवाले यांनी 'अ' गटातून, अरुण जावीर व प्रताप मेत्रांनी यांनी 'अ' गट एससी राखीव मधून, मनीषा रांगोळे यांनी 'अ' गट महिला, ओबीसी गटातून बाळासाहेब कदम, म्हाळाप्पा पिसूत्रे व मिथुन पाटील व 'ब' गटातून अमित रणदिवे यांचा समावेश आहे.
हेही वाचा