बेळगावात गॅस गळतीमुळे आगीचा भडका; पिता-पुत्र गंभीर जखमी | पुढारी

बेळगावात गॅस गळतीमुळे आगीचा भडका; पिता-पुत्र गंभीर जखमी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा पाणी तापवण्यासाठी स्वयंपाक घरात गेले असता गॅस पेटवताना गळतीचा अंदाज न आल्याने अचानक आगीचा भडका उडाला. यामध्ये वडील व मुलगा भाजून गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना (मंगळवार) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास माळमारुती परिसरात घडली.

कृष्णाजी बसवंतराव हळदकर (वय 60) व बसवराज कृष्णाजी हळदकर (वय 16, दोघेही रा. साई मंदिर जवळ, वंटमुरी कॉलनी) अशी जखमींची नावे आहेत.

मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कृष्णाजी हे पाणी तापवण्यासाठी स्वयंपाक घरात गेले. यावेळी त्यांचा दहावीत शिकत असलेला मुलगा बसवराज हा बाजूलाच थांबला होता. दोघांनाही गॅस गळतीचा अंदाज आला नाही. लाईटर पेटवताच आगीचा भडका उडाला. यामध्ये दोघेही भाजून गंभीर जखमी झाले. त्यांना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कृष्णाजी हे 90 टक्के भाजले असून, मुलगा बसवराज 52 टक्के भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button