NMML Changed to PMML : कोणी नेहरूंचे योगदान हिरावून घेऊ शकत नाही: काँग्रेसची भाजपवर टीकास्त्र | पुढारी

NMML Changed to PMML : कोणी नेहरूंचे योगदान हिरावून घेऊ शकत नाही: काँग्रेसची भाजपवर टीकास्त्र

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: राजधानी दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी (NMML) चे अधिकृत नाव बदलल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील पंडित जवाहरलाल नेहरूंचे मोठे योगदान पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही हिरावून घेऊ शकत नाहीत, असे काँग्रेसने स्पष्टपणे सांगितले. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आज (दि.१६) ट्विट करून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. (NMML Changed to PMML)

जयराम रमेश म्हणाले की, पंतप्रधान मोदींमध्ये भीती, गुंतागुंत आणि असुरक्षिततेचा भावना वाढू लागली आहे. त्यामुळे देशाच्या पहिल्या आणि सर्वात जास्त काळ सेवा बजावलेल्या पंतप्रधानांबाबत विचार केला जात आहे. नेहरू आणि नेहरूवादी वारसा नाकारणे, विकृत करणे, बदनाम करणे आणि नष्ट करणे हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे. (NMML Changed to PMML)

काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी म्हणाले की, नेहरूजींनी स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्य मिळविण्यात त्यांनी मोठी मदत केली आहे. नेहरू मेमोरिअल म्युझियम आणि लायब्ररीचे नाव बदलून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या व्यक्तीचे नाव बदलणे, हा देशाचा अपमान आहे. जवाहरलाल नेहरूंनी इतका मोठा पल्ला गाठला होता की, त्यांना तुमच्या दयेची गरज नाही. त्यांचे नाव अमर आहे.

तर दुसरीकडे, काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, ही खेदाची बाब आहे. मला वाटते की, सर्व पंतप्रधानांना सामावून घेण्यासाठी इमारतीचा विस्तार करण्याची कल्पना चांगली आहे. परंतु, या प्रक्रियेत अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्यासाठी स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पंतप्रधानांना डावलणे ही एक छोटी गोष्ट आहे. ते आतापर्यंतचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले आहेत. तुम्ही नेहरू मेमोरियल पंतप्रधान संग्रहालय म्हणू शकला असता. ही क्षुल्लकता दुर्दैवी आहे. आणि ती ऐतिहासिक भूतकाळाबद्दल एक विशिष्ट कटुता दर्शवते.

हेही वाचा 

Back to top button