बेळगाव : जैन आश्रमाचे स्वामी आचार्य कामकुमार नंदी महाराज यांची निर्घृण हत्‍या

स्वामी आचार्य कामकुमार नंदी महाराज
स्वामी आचार्य कामकुमार नंदी महाराज
Published on
Updated on

चिकोडी : पुढारी वृत्तसेवा चिकोडीजवळील हिरेकोडी पर्वतावरील जैन आश्रमाचे स्वामी आचार्य कामकुमार नंदी महाराज यांची हत्या झाल्याचं निष्पन्न झाले आहे. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून, मुनींची हत्या कुणी आणि का केली, या दृष्टीने तपास सुरू असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितलं. पैशाच्या व्यवहारातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे.

कामकुमार नंदी महाराज बुधवारी रात्रीपासून आश्रमातून बेपत्ता होते. शुक्रवारी दुपारी त्यांच्या भक्तांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार चिकोडी पोलिसांमध्ये नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

स्वामींचा खून आश्रमातच करून मृतदेह दूरवर नेऊन फेकण्यात आला, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. काहीजणांनी स्वामींकडून उसने पैसे घेतले होते. ते पैसे स्वामींनी परत मागितल्याने त्यांचा खून केल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. पाटील यांनी शनिवारी सकाळी चिकोडीजवळच्या खटकभावी गावाला भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. हे गाव रायबाग तालुक्यात येते.

स्वामी बेपत्ता झालेल्या दिवशी तसेच त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच गेल्या मंगळवारी आणि बुधवारी आश्रमाला कोणी कोणी भेट दिली होती, याचाही तपास सुरू आहे.

मृतदेह अजून सापडलेला नाही. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी कटकभावी गावच्या शिवारात मृतदेह फेकल्याचे सांगितले. मात्र शिवारात पहाटेपासून शोधकार्य सुरू असून मृतदेह सापडलेला नाही.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news