Chhatrapati Sambhaji Nagar News : अश्लील चाळे करणाऱ्याविरूद्ध १२ तासांत चार्जशीट अन् ६ महिने कारावास

Chhatrapati Sambhaji Nagar News : अश्लील चाळे करणाऱ्याविरूद्ध १२ तासांत चार्जशीट अन् ६ महिने कारावास
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महिलांसमोर अश्लील चाळे करणाऱ्याविरोधात उस्मानपुरा पोलिसांनी २६ जुलै २०२२ रोजी कारवाई केली होती. (Chhatrapati Sambhaji Nagar News) या प्रकरणात विनयभंगाचा गुन्हा नोंदविला होता. दरम्यान, पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी १२ तासांत दोषारोपपत्र दाखल केले होते. आता न्या. एस. एस. छल्लानी यांनी आरोपीला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी दिली.

शेख रहीम शेख अजीज (२१, रा. शम्सनगर, शहानूरवाडी) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. महिलांना पाहून शेख रहीम हा अश्लील चाळे करीत असल्याची माहिती तत्कालिन पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांना मिळाली होती. त्यांनी आरोपीला रंगेहात पकडण्यासाठी तयारी केली. २६ जुलै २०२२ रोजी तो ३० वर्षीय महिलांसमोर येऊन अश्लील चाळे करीत असल्याचा कॉल बागवडे यांना आला. त्यांनी लगेचच पथकासह घटनास्थळी जाऊन आरोपी शेख रहीमची चांगलीच धुलाई (Chhatrapati Sambhaji Nagar News)  केली होती.

१२ तासांत दोषारोपपत्र, पाच दिवसांत निकाल

या प्रकरणाचा तपास गीता बागवडे यांनी स्वत:कडे घेतला. त्यांनी आरोपीला अटक करून लगेचच न्यायालयात हजर केले होते. तसेच, तत्काळ तपास सुरु करून अवघ्या १२ तासांत तपास पूर्ण करीत न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले होते. न्यायालयानेही हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेत पाच दिवसांत सुनावणी पूर्ण केली होती.

अन् आरोपी झाला पसार

या प्रकरणात आपल्याला शिक्षा लागणार हे आरोपीला पहिल्या दोन-तीन दिवसांतच लक्षात आले होते. त्यामुळे तो गायब झाला. तिकडे न्यायालयाने पाच दिवसांत सुनावणी पूर्ण करून निकालासाठी आरोपीला हजर करण्याचे आदेश दिले. मात्र, आरोपी शेख रहीम पसार झाला होता. त्यामुळे वर्षभरापासून शिक्षा सुनावली नव्हती. न्यायालयाने आरोपी शेख रहीमच्या नावाने वॉरंट बजावले होते.

उस्मानपुरा पोलिसांनी केली अटक

जुलै २०२२ पासून फरार असलेला आरोपी शेख रहीम शहरात आल्याची खबर लागताच सहायक पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शेख इसरार व नाना पगारे यांनी दर्गा चौकात सापळा लावून त्याला पकडले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्या. एस. एस. छल्लानी यांनी त्याला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news