निपाणी : कणगल्याजवळ कोल्ड्रिंक्सचा कंटेनर उलटला; बाटल्‍या पळवण्यासाठी लोकांची झुंबड (Video)

कोल्‍ड्रिंक्‍सचा कंटेनर उलटला
कोल्‍ड्रिंक्‍सचा कंटेनर उलटला
Published on
Updated on

निपाणी ; मधुकर पाटील पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर संकेश्वर (ता.हुकेरी) हद्दीतील कणगला येथे कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या घेऊन जाणारा कंटेनर आज (सोमवार) सकाळी उलटला. या अपघातात कोल्‍ड्रींक्‍सच्या बॉटल्‍यांचे ट्रे रस्‍त्‍यावर विखुरल्‍या. अशावेळी मदत करायचे सोडून रस्‍त्‍यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी या कोल्ड्रिंक्सच्या बाटल्‍यांचे बॉक्‍स आणि ट्रेच पळवले. या रस्‍त्‍यावरून जाणाऱ्यांनी दुचाकी, चारचाकी अक्षरशहा रिक्षांतूनही या बाटल्या पळवल्या. भर रस्त्यावर चाललेली लूट पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. बाटल्या पळवितानाचे व्हिडीओ फोटो पाहून संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे संकेश्वर पोलिसांनी सांगितले. या अपघातात चालक (नाव समजले नाही) किरकोळ जखमी झाला आहे.त्याच्यावर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक (कंटेनर) बंगळूर येथून गुजरातकडे जात होता.

दरम्यान रस्त्यावर कोल्ड्रिंक्सच्या बाटल्यांचा खच पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. तेथे या बाटल्या नेण्यासाठी परिसरातील नागरिकांसह महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची एकच झुंबड उडाली. दरम्यान कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या नेतानाचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन त्याचे चित्रीकरणही काहींनी केले. पोलिसांकडे यातील अनेक व्हिडीओ, फोटो आले आहेत. दरम्यान घटनास्थळी रस्ते देखभाल औताडे कंपनीच्या भरारी पथकाच्या निरीक्षक संतराम माळगे यांच्यासह कर्मचारी तसेच संकेश्वर पोलीस ठाण्याचे सीपीआय प्रल्हाद चनगिरी यांनी भेट देऊन पाहणी केली असून, या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

या अपघात इतका भीषण होता की, कंटेनरचे दोन तुकडे होऊन अपघातग्रस्त कंटेनर रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. यामध्ये कंटेनरचे मोठे नुकसान झाले असून, चालक जखमी झाला आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news