बेळगाव : जोतिबा यात्रा काळात भक्तांना निवासासाठी जागा द्यावी : कंग्राळी खुर्द ग्रामस्थांची मागणी

कंग्राळी खुर्द; पुढारी वृत्तसेवा : श्री जोतिबा यात्रा काळात सासनकाठी व भक्तांना निवासासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कंग्राळी खुर्द गावच्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पश्चिम महाराष्टू देवस्थान समितीला देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शेकडो वर्षांच्या परंपरेप्रमाणे गावची सासनकाठी व भक्त श्री जोतिबा यात्रेला जातात. तेथे गट क्रमांक ७ मध्ये ४०X३० जागेत सासनकाठी व भक्तगण यात्रेवेळी पाच दिवस राहतात. परंतू गेल्या वर्षीपासून काही स्थानिक लोक त्या ठिकाणी राहण्यास अटकाव करत आहेत. यात्रा काळात सदर जागा परंपरेप्रमाणे मिळावी. आम्ही नियमाप्रमाणे भूभाडे भरणार आहे, असे म्हटले आहे. देवस्थान समितीचे शिवराज नाईकवडी यांनी हे निवेदन स्विकारले. तसेच यात्रा काळात जागा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी यल्लापा पाटील, प्रशांत पाटील, यशोधन तुळसकर, वैजनाथ बेन्नाळकर, राकेश पाटील, वाय.आर. पाटील, मनोहर पाटील, भटजी सांगळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
- अनिल परब यांची अडचण वाढणार? सदानंद कदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- मुका घ्या नाही तर मिठ्या मारा, आम्हाला लक्ष करू नका! संजय राऊतांचे सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र
- विधानसभेत मंत्री गायब; अजित पवार भडकले; फडणवीसांनी व्यक्त केली दिलगीरी