बेळगाव : शिनोळी बुद्रुकच्या सरपंचपदी ‘चहावाला’ | पुढारी

बेळगाव : शिनोळी बुद्रुकच्या सरपंचपदी 'चहावाला'

शिनोळी खुर्द(बेळगाव), पुढारी वृत्‍तसेवा : बेळगाव तालुक्याच्या सीमेजवळील सर्वाधिक कर उत्पन्न असलेल्या शिनोळी बुद्रुक गावच्या सरपंचपदी चहावाला सरपंच झाला आहे. सरपंच गणपत कांबळे असे त्‍यांचे नाव आहे. ते गावात चहाचा व्यवसाय करतात.

सरपंच गणपत कांबळे माध्यमांशी बोलताना म्‍हणाले, “माझी सरपंच निवड ही भारतीय घटनेचे शिल्‍पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय आहे. ग्रामस्‍थांनी मला संधी दिली आहे. सरपंचपदाच्‍या माध्‍यमातून मी गावाच्‍या विकासाठी प्रयत्‍न करने.  गावात शैक्षणिक सोयीसुविधांना मी प्राधान्य देणार आहे.”

दरम्‍यान,  बेळगाव तालुक्याच्या सीमेवरचे आणि चंदगड तालुक्यात सर्वाधिक कर. उत्पन्न असलेल्या शिनोळी बुद्रुक ग्राम पंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत थेट लोकनियुक्त सरपंचपदी गणपत कांबळे यांची निवड झाली आहे. ते चहा विक्रेते आहेत. त्यामुळे चहा विक्रेता ते थेट लोकनियुक्त सरपंच असा कांबळे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. या पंचायतीच्या रपंच पदासाठी गुरुवारी १२ रोजी मतदान होणार आहे. उपसरपंच गणपत कांबळे सकाळी १० वा. निवड निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून ग्रामपंचायत कार्यालयात होईल. ग्राम पंचायतीचे ९ सदस्य आणि लोकनियुक्त सरपंच असे एकूण १० मतदार आहेत.

उपसरपंच निवड कायद्यानुसार दोन्ही गटांना समान मत पडल्यास सरपंचाला दुसऱ्यांदा मतदान करण्याचा अधिकार आहे. या निवडणुकीकडे तालुक्यासह सीमेलगतच्या गावांच्या नजरा आहेत. चंदगड तालुक्यातील सर्वाधिक कर असणारी ग्रामपंचायत असा लौकिक शिनोळी बुद्रुककडे आहे. कारण या गावाच्या व्याप्तीत औद्योगिक वसाहत येते. या वसाहतीत सीमाभागातील कारखानदारांचेही कारखाने आहेत. शिवाय, बहुतांशी कामगार सीमाभागातून शिनोळीला जातात.

पंचवार्षिक निवडणुकीत गावातील आमदार राजेश पटील गट

व माजी मंत्री भरमूअण्णा पाटील गटळ यांच्या शाहू परिवर्तन आघाडीकडून पुंडलिक गवसेकर, रामकृष्ण सुतार, परशराम कांबळे, चंद्रिका डागेकर, बबीता तानगावडे, नंदा ल. मेणसे, श्वेताना. बोकमूरकर हे निवडून आले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवशाही आघाडीमधून मावळते सरपंच नितीन पाटील व निकिता गुडेकर हे दोघे जण निवडून आले आहेत. दोन्ही गटांकडून उमेदवार दिले जातील की एकच गट उमेदवार देणार, हे उद्याच स्पष्ट होईल.

हेही वाचा :

Back to top button