५४ लाखांचा गांजा इंदापूर पोलिसांनी पकडला, तीन कारसह पाच जणांना अटक | पुढारी

५४ लाखांचा गांजा इंदापूर पोलिसांनी पकडला, तीन कारसह पाच जणांना अटक

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा: इंदापुर पोलीस आणि ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करीत इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी गावच्या हद्दीतून विशाखापट्टणम येथून विक्रीसाठी आणलेला २१८ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त केला. इंदापूर पोलीसांनी केलेली ही मोठी कारवाई असून जप्त करण्यात आलेल्या गांज्याची अंदाजे किंमत ५४ लाख ५५ हजार आहे. या कारवाईत तीन कारसह ८० लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी अमिर गुलाब मुलाणी (रा. मळद ता. बारामती), प्रकाश राजेंद्र हळदे (रा. सातव शाळेजवळ, बारामती ता. बारामती, मुळ रा. मुखाई एसटी स्टँडजवळ ता. शिरूर), खंडु अश्रु परखड (रा. पावणे वाडी, ता. बारामती, मुळ रा. लोणी पारवड वस्ती, ता. जामखेड, जि.अहमदनगर), रोहन उर्फ फलेसिंग काशीनाथ जगताप (रा. देसाई इस्टेट, क्रिडा संकुल मागे बारामती मुळ रा. पणदरे कौतुक नगर सावतामाळी मंदिराजवळ ता. बारामती) आणि सुरज भगवान कोकरे (रा. हनुमंतवाडी पणदरे, ता. बारामती) यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलीसांनी सरडेवाडी गावच्याहद्दीत सापळा लावला असता एक आय ट्वेंन्टी कार (एमएच ०५ सीएम ८५००) आणि एक टाटा कंपनीची हॅरीहर कार (एमएच ४२ बीई ४९२५) ला पोलीसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु न थांबत ती पुणे बाजूकडे गेल्याने पोलिसांनी तिचा पाठलाग केला. निमगाव केतकी गावच्या हद्दीत सोनाई डेअरी जवळ चालकाला ताब्यात घेऊन वाहनाची तपासणी केली असता या कारच्या डिक्कीत व मधल्या सिटच्याखाली गांजा मिळून आला. या दोन्ही वाहनांवर अल्टो कार (एमएच १८ व्ही ३६५) ही मागे-पुढे निगराणी करीत होती. गांजाचे व्यापारी हे विशाखापट्टणम येथून ओलसर गांजा आणून तो पुढे विक्रीसाठी घेऊन जात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गु्हे अन्वेशनचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके, इंदापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदिप सुर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, ज्ञानेश्वर धनवे, महेश माने, पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे, सुधीर पाडुळे, गणेश जगदाळे, अभिजीत एकशिंगे, गणेश जगदाळे,अमित शिद, बाळासाहेब कारडे, काशीनाथ राजापुरे, युवराज कदम, बापू मोहिते, सलमान खान, विकास राखडे, विशाल चौधर, मंगेश ढिगळे, दगडु विरकर यांच्या पथकाने केली आहे.

Back to top button