कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ, अलमट्टी धरणातून १ लाख २० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू | पुढारी

कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ, अलमट्टी धरणातून १ लाख २० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : अलमट्टी धरणातून गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून पुन्हा एक लाख वीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे खालील गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या चार दिवसांपासून परतीचा पाऊस जोरदार बरसत असल्यामुळे त्याचबरोबर महाराष्ट्रातही पाऊस जोरदार सुरू असल्यामुळे कोयना धरणातून आणि कण्हेर, धोम धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

यामुळे अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. बुधवारी 20 हजार पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. रात्री 90 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग 1 लाख 20 हजार करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अलमट्टी धरणाची क्षमता 123.01 टीएमसी असून सध्या हे धरण काटोकाट भरले आहे.

हेही वाचा 

कोल्हापूर : शिवसेना फोडण्याचे पाप भाजपचेच – जयंत पाटील 

भीमाशंकर : विद्यार्थ्यांना करावा लागतो गैरसोयींचा सामना 

आंबेगावतील अनेक ग्रा.पं.मध्ये भ्रष्टाचार; सरपंच झाले ठेकेदार; निकृष्ट, अपूर्ण कामांची होतात पूर्ण बिले 

Back to top button