भारतातील खोकला सिरप बनवणाऱ्या कंपनीविरुद्ध WHO कडून अलर्ट जारी | पुढारी

भारतातील खोकला सिरप बनवणाऱ्या कंपनीविरुद्ध WHO कडून अलर्ट जारी

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतातील कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीविरुद्ध डब्ल्यूएचओकडून (WHO) अलर्ट जारी करण्यात आला आहे. WHO ने मेडेन फार्मास्युटिकल्स ऑफ इंडियाने बनवलेल्या चार खोकला, सर्दी सिरपवर किडनीच्या दुखापतींशी आणि गॅम्बियामधील 66 मुलांच्या मृत्यूशी संबंधित अलर्ट जारी केला आला आहे. रॉयटर्सने डब्ल्यूएचओच्या हवाल्याने सांगितले की, कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसह पुढील तपास केला जात आहे.

आरोग्य संघटनेने आपल्या एका वैद्यकीय अलर्टमध्ये म्हटले आहे की, प्रयोगशाळेत मेडेन फार्मास्युटिकल्स ऑफ इंडियाने बनवलेल्या चार उत्पादनांच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले, पुष्टी केली की या उत्पादनांमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकॉलची अस्वीकार्य मात्रा आहे.

या प्रकरणाबाबत डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सांगितले की, डब्ल्यूएचओने आज गांबियामध्ये गंभीर मूत्रपिंडाच्या दुखापती आणि मुलांमधील 66 मृत्यूंशी संबंधित असलेल्या चार दूषित औषधांसाठी वैद्यकीय उत्पादन अलर्ट जारी केला आहे. या मुलांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

इतर देशांना अलर्ट
“भारतातील मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडद्वारे खोकला आणि सर्दी सिरप ही चार औषधे तयार केली आहेत. WHO भारतातील संबंधित कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसह पुढील तपास करत आहे. दूषित उत्पादने आतापर्यंत फक्त गॅम्बियामध्ये आढळली आहेत, ती इतर देशांमध्ये वितरित केली गेली असतील. डब्ल्यूएचओ सर्व देशांतील रूग्णांनाचे आणखी नुकसान टाळण्यासाठी ही उत्पादने शोधून ती नष्ट करण्याची शिफारस करतो, असे डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी म्हटले आहे.

Back to top button