कोल्हापूर : पुणे-बंगळूर महामार्गावर कर्नाटक बसला अपघात; एक ठार, ६ जखमी | पुढारी

कोल्हापूर : पुणे-बंगळूर महामार्गावर कर्नाटक बसला अपघात; एक ठार, ६ जखमी

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टोप-संभापूरजवळ भरधाव कर्नाटक बस उलटून झालेल्या अपघातात एक ठार तर सहाजण जखमी झाले. सुधीर भाऊसाहेब पाटील (वय ३२ रा. कुल, ता.निपाणी, जि. बेळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हा अपघात सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडला. जखमींवर कोल्हापूरमधील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोल्‍हापूर : किणीतल्‍या मंडळाने साकारली आदर्श गावाची प्रतिकृती; गणेशोत्‍सवानंतरही अधिकाऱ्यांच्या भेटी

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे येथून बेळगावकडे निघालेली कर्नाटक डेपोची बस ( क्र. के. ए. ६३ एफ ०१३७) प्रवाशी घेवून जात होती. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास टोप गावच्या हद्दीत असणाऱ्या टोयाटो कार शोरूमजवळ आले असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटून बस रस्त्यावर पलटी झाली.

या अपघातात बसमधील सुधीर पाटील याचा मृत्यू झाला. तर मौला आबालाल बागवान, रा. चिक्कोडी, रोहिणी मारूती कदम रा.बसर्गे, इश्या बाळासाहेब कांबळे, रा. पुणे, चंद्रशेखर लक्ष्मण गावडे रा पुणे, रूकय्या बाळून हुसेन सौदागर रा. बेळगांव, वाहक रविकुमार हे जखमी झाले आहेत. चालक शंकरगौंडा भरमागौडा पाटील रा. जि. हावेरी, कर्नाटक याने निष्काळजीपणे गाडी चालवल्याने अपघात झाला, अशी फिर्याद सिध्देश्वर पुजाप्पा सुनगार (वय ४८ रा. जोशी, ता.धारवाड) याने दिली आहे. या अपघाताची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली आहे.

हेही वाचा :

Back to top button