बेळगावात वृक्ष कोसळून दुचाकीस्वार जागीच ठार, दुसरा जखमी | पुढारी

बेळगावात वृक्ष कोसळून दुचाकीस्वार जागीच ठार, दुसरा जखमी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : रहदारीच्या चन्नम्मा सर्कल ते आरटीओ रस्त्यावर अचानक भलामोठा वृक्ष कोसळून रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारापैकी एक जण जागीच ठार झाला, तर दुसरा जखमी झाला. आज (मंगळवार) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास न्यायालयापासून काही अंतरावर असलेल्या मराठा मंडळ हायस्कूलजवळ ही घटना घडली.

जीर्ण झालेला वृक्ष रस्त्यावरच कोसळल्याची घटना घडली. आरटीओ सर्कलकडून चन्नम्मा सर्कलकडे निघालेल्या दोन दुचाकींवर या जीर्ण वृक्षाच्या फांद्या पडल्या. यापैकी एक दुचाकीस्वार थेट मोठ्या फांदीच्या खाली सापडल्याने त्याचे हेल्मेट बाजूला पडून डोक्‍याला जबर मार लागल्याने रक्तबंबाळ होऊन त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला. राकेश सुलदाळ (वय 27, रा. सिद्दनहळी तालुका गोकाक) असे मृत व्यक्‍तीचे नाव आहे.

दुसऱ्या दुचाकीस्वाराची दुचाकी फांदीखाली सापडली. परंतु, सुदैवाने ते बाजूला पडल्याने त्यांना फारसे लागले नाही. वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस व मार्केट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्‍यांनी जखमीला तात्‍काळ रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा :  

Back to top button